वणी टाईम्स न्यूज : पाटणबोरी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकमत समाचार चे वार्ताहर संतोष देविदास नक्षणे (48) यांचे गुरुवार दि. 14 मे रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संतोष नक्षणे हे सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असून पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या अकाली निधनामुळे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई, एक भाऊ, दोन बहिणी तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवार दि. 15 मे रोजी सकाळी 10 वाजता पाटणबोरी येथील स्थानिक मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.










