वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्र राज्याच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त १ मे रोजी नगर परिषद वणी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नगराध्यक्ष विद्या आत्राम या प्रशिक्षणासाठी पुणे येथे उपस्थित असल्याने, नगर परिषद उपाध्यक्ष राकेश बुगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी सचिन गाडे, नगरसेवक, अधिकारी तसेच नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून तिरंग्याला मानवंदना दिली. परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमादरम्यान नगर विकास, स्वच्छता आणि नागरिकांच्या सेवेसाठी अधिक सक्षम प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून वणी शहरातही नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.










