वणी टाईम्स न्युज : भरधाव वेन्यू कार चालकाने समोर जात असलेल्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यानंतर कार समोरुन येणाऱ्या टाटा सफारी वाहनावर जाऊन आदळली. मारेगाव करंजी मार्गावर शिवनाळा फाट्याजवळ शुक्रवार 2 मे रोजी घडलेल्या या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला तर टाटा सफारी वाहनाचे अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. फिर्यादी टाटा सफारी चालक पो. ना. किशोर झेंडेकर, स्था. गु. शाखा यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात कार चालक विलास महादेव जोगी (58), रा. भद्रावती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी हा स्था. गु.शाखा यवतमाळ येथे पोलीस नाईक पदावर असून वणी पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे कामी टाटा सफारी क्रमांक MH28-BK6060 या खाजगी वाहनाने वणीकडे येत होता. करंजी ते मारेगाव मार्गावर शिवनाळा फाट्याजवळ समोरुन येणाऱ्या वेन्यू कार क्रमांक MH34-CJ 0156 चे चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत त्याचे समोर जाणाऱ्या एका दुचाकी धडक देऊन फिर्यादी चालवत असलेल्या टाटा सफारी वाहनाचे उजव्या बाजूला टक्कर मारली.
या अपघातात दुचाकी क्रमांक MH 29 BB 4266 चा चालक अमित वामनराव घुमे (29) रा. वणी हा जखमी झाला. तर टाटा सफारी वाहनाचे बोनट, मडगार्ड, हेडलाईट डॅमेज होऊन अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. फिर्यादी किशोर झेंडेकर यांनी याबाबत मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी कारचालक विलास महादेव जोगी (58), रा. भद्रावती विरुद्ध 324(4), 125 (a), 281 नुसार गुन्हा दाखल केला.