जितेंद्र कोठारी, वणी : स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यामध्ये आपण बाजारपेठ, मुख्य म्हणजे रस्त्यालगत घर असणे खूप प्रतिष्ठेचे किंवा भविष्यकालीन फायद्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे समजतो. मात्र रस्त्यालगत घर बांधण्याच्या बाबतीत ग्रामपंचायत असो किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा राज्य रस्ते विकास महामंडळ यांचे काही नियम असतात व या नियमांना धरूनच जर घराचे बांधकाम केले असेल तर भविष्यकालीन होणारे नुकसान टाळता येते.
बऱ्याचदा नियम डावलून जर घर बांधले गेले असेल तर रस्त्याच्या विस्तारीकरण किंवा इतर काही कामांमुळे अतिक्रमणाच्या नावाखाली ते घर पाडले जाते व मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. या दृष्टिकोनातून रस्त्यालगत घर बांधण्याच्या बाबतीत नेमके काय नियम आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
रस्त्यालगत घर बांधण्याबाबत काय आहेत नियम ?
महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेली सुधारणानुसार पथकिनारवर्ती नियम तयार करण्यात आले आहे. या नियमानुसार रस्त्याचा दर्जा व त्यापासून बांधकाम करण्याचे अंतर अधोलेखित करण्यात आले आहे. खाली दिलेल्या तक्त्यानुसार जाणून घ्या कायदा –
विशेष म्हणजे शासनस्तरावर पथकिनारवर्ती नियमात कोणत्याही प्रकारची शिथीलता देण्यात येणार नाही. सबब यापुढे पथकिनारवर्ती नियमात शिथीलता देण्याबाबतचे प्रस्ताव महसूल व वन विभागाकडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनास सादर करण्यात येणार नाहीत व अशी शिथीलता देण्यात येणार नाही. असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र नगर विकास विभाग शासन निर्णय क्र.टीपीएस 1819/अनौंस-36/19/नवि-13 दिनांक 5/8/2019 चे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.