वणी टाईम्स न्युज : वाढदिवस हा प्रत्येकासाठी खूप खास दिवस असतो. त्यातही लहान मुलं मुलींचा वाढदिवस खूप उत्साहाने साजरा केल्या जातो. वाढदिवशी पार्टीचे नियोजन केले जाते, फुगे फुगवले जातात, सुंदर डेकोरेशन केले जाते, मेणबत्ती लावली जाते, केक कापला जातो. तसेच निरनिराळ्या प्रकारच्या आतिषबाजी व डिजे वर डान्स केल्या जाते. मात्र वाढदिवस साजरा करताना काहीवेळा धोकादायक स्थित्या निर्माण होऊ शकतात, जसे की फुग्यांचा स्फोट, स्नो स्प्रेमुळे आग किंवा फटाक्यांमुळे भाजणे. त्यामुळे, वाढदिवस साजरा करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
हल्ली वाढदिवस, लग्न वर्षगांठ किंवा इतर कार्यक्रमात केक कापण्याची प्रथा उदयास आली आहे. त्यासोबतच केकवर स्पार्कल मेणबत्ती, हायड्रोजन गॅस भरलेले फुगे, रंगबिरंग्या अंगार फेकणाऱ्या पायरो गन तसेच स्नो स्प्रे उडविण्याचा प्रकार सर्रास केल्या जाते. परंतु कधीकधी एका छोट्याशा चुकीमुळे खुशी आणि उत्साहाच्या अशा कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडण्याची अनेक घटना समोर आल्या आहे.
नुकतेच रविवारी सायंकाळी शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये लहान मुलाचा वाढदिवस साजरा करताना अशीच घटना घडली. वाढदिवसा निमित्त आयोजित जेवणाच्या कार्यक्रमासाठी कुटुंबीय व काही जवळील नातेवाईक पोहचले होते. जेवणाचा ऑर्डर देण्यात आला. तत्पूर्वी बर्थडे केक कापण्याचे ठरविले. केक कापण्याचा अगोदर थ्रिल म्हणून एका जणांनी आपल्या जवळील पायरोगनचा बटण दाबला. आणि क्षणातच होत्याच नव्हत झाला.
पायरो गनचा बटण दाबताच हातातच त्याचा स्फोट झाला आणि बाजूलाच उभ्या असलेल्या 5 वर्षाच्या बर्थडे बॉयच्या चेहऱ्यावर आगीच्या ठिणग्या उडाल्या. या घटनेत मुलाच्या नाकावर व डोळ्याला गंभीर इजा झाली असून वाढदिवसाचा कार्यक्रम सोडून रात्रीच त्याला नागपूर येथे दाखल करण्यात आला. सुदैवाने या घटनेत मुलाच्या डोळ्याला आतून इजा झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तुम्ही स्वतःचा किंवा मुलांचे वाढदिवस साजरा करताना स्फोटक वस्तूंबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा क्षणात रंगात भंग होण्यास वेळ लागणार नाही.
विनंती : बातमी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा