वणी टाईम्स न्युज : वणी यवतमाळ महामार्गावर एका भरधाव कारने दुचाकीला धडक देऊन तब्बल 500 मीटरपर्यंत फरफटत नेले. या अपघातात दुचाकीस्वार दोघजण गंभीर जखमी झाले. मारेगावचे पुढे बोटोनी जवळ शनिवार 29 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान घडलेल्या या अपघातात जखमी युवकांचे नाव सतीश झिंगू आत्राम (35) व निलेश तुकाराम टेकाम (21) राहणार वागदरा तालुका मारेगाव आहे. अपघातानंतर कारचालक कार घेऊन पसार होण्यास यशस्वी झाला. तर जखमींना उपचारासाठी यवतमाळ येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार दुचाकी वरील युवक काही कामानिमित्त घोगूलदरा येथे गेले होते. तिथून परत गावाकडे जाण्यासाठी निघाले असता घोगूलदरा फाट्यावर वणीच्या दिशेकडून येणाऱ्या एका कारने त्यांचा दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की कारने दुचाकीला तब्बल 500 मीटर पर्यंत फरफटत नेले. दुचाकी ला धडक देणाऱ्या कारचा मारेगाव पोलीस शोध घेत आहे.