वणी टाईम्स न्युज : तुम्ही जर चांगल्या कंडीशनची सेकंडहँड दुचाकी, ऑटो, कार किंवा ट्रॅक घेण्यास इच्छुक असेल तर, एक चांगली संधी 19 मार्च रोजी उपलब्ध होणार आहे. वणी पोलीस स्टेशनतर्फे विविध गुन्ह्यामध्ये जब्त व बेवारस 90 वाहनांचा उपविभागीय दंडाधिकारी वणी यांचे आदेशाने 19 मार्च रोजी सार्वजनिक लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात सर्व सामान्य नागरिकांना योग्य बोली लावून वाहन खरेदी करता येणार आहे. खरेदी केलेल्या वाहनाचा परिवहन विभागातर्फे अधिकृत परवाना दिला जाणार आहे.
लिलाव केल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये TVS MAX 100, बजाज प्लॅटिना, हिरो होंडा स्प्लेंडर, पेशन, SS, बजाज बॉक्सर, टीव्हीएस सामुराई, हिरो होंडा CD 100, बजाज पल्सर, बजाज M80, टीव्हीएस ज्युपिटर असे दुचाकी वाहन तसेच बजाज ऑटो, मारुती 800, मारुती ओमानी, टाटा 207, अशोक लेलँड ट्रक, टिप्पर या वाहनाचा समावेश आहे. अनेक वर्षापासून पडून असल्यामुळे काही वाहन भंगार अवस्थेत पोहचले आहे तर बहुतांश वाहन चांगल्या कंडीशनचे आहे.
वणी पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरीकांना आव्हान करण्यात आले आहे की लिलावपूर्वी कोणास काही मालकी हक्क सांगावयाचा असेल तर, त्यांनी वाहनाचे मुळ कागदोपत्री/दस्तऐवजासह पोलीस स्टेशन वणी येथे हजर यावे. जर मुदतीत कोणीही योग्य हरकती न दाखविल्यास बेवारस वाहनांचा नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येईल. तद्नंतर कोणतेही आक्षेप/हरकतची नोंद घेण्यात येणार नाही.