जितेंद्र कोठारी, वणी : प्रभू श्री राम जन्मोत्सव निमित्त येथील जुन्या स्टेट बँक जवळ प्रभू श्रीराम मंदिरात 2 ते 6 एप्रिल दरम्यान विविध सांस्कृतिक व भक्ती गीतांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम भक्त समाजसेवी विजय चोरडिया, राजाभाऊ बिलोरिया, अरुण कावडकर यांचे मार्गदर्शनात व प्रभू श्रीराम देवस्थान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष भास्कर गोरे, उपाध्यक्ष किरण बुजोने व सचिव अमोल वैद्य यांच्या देखरेखीत श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार 2 एप्रिल व गुरुवार 3 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 ते 10 पर्यंत इंदूर येथील अभय मानके हे संगीतमय गीत रामायण सादर करणार आहेत. शुक्रवार 4 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता खंदारे सर संगीत रजनी कार्यक्रम ‘स्वरसाज’ प्रस्तुत करणार आहे. शनिवार 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता नागपूर येथील नंदू गोहणे आणि ग्रुपचे आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. तर रविवार 6 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता प्रभू श्रीराम मंदिरात ‘श्रीराम जन्म’ साजरा करण्यात येणार आहे.
श्रीराम जन्मोत्सव निमित्त प्रभू श्रीराम मंदिर जुनी स्टेट बँक जवळ येथे आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचा आवाहन मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर गोरे व देवस्थान समितीने केला आहे.