वणी टाईम्स न्युज :आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्य 21 जून 2024 रोजी वणी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे योग दिवस साजरा करण्यात आला. परम पूज्य स्वामीजी महाराज यांचे प्रेरणेने सामाजिक कार्यकर्ता विजय बाबू चोरडीया व भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे विशेष सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
योग शिबिरात योग शिक्षक संजय आस्कर, सह योग शिक्षक जयंत सोनटक्के यांचे मार्गदर्शनात प्रोटोकॉल नुसार प्रथम सूक्ष्म व्यायाम, आसन, प्राणायाम घेण्यात आले. त्यानंतर महिला सक्षमीकरण अंतर्गत मी अँड मॉम या थीम नुसार आई व मुलगी/ मुलगा यांचे कठीण आसनांचे प्रात्यक्षिक व सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मॉर्निंग ग्रुप वणी, विठ्ठल मंदिर वणी येथील योगसाधक तसेच शहरातील योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग शिबिरात सहभागी सर्व योगसाधकांना फलाहारची व्यवस्था करण्यात आली होती. योग दिवस कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुरेश आवारी व त्यांची चमू यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर क्रेडाई वणीचे अध्यक्ष किरण दिकुंडवार यांनी योग शिक्षक व उपस्थित सर्व योग साधकांचे आभार मानले.