वणी: भारतीय जीवन विमा निगम (LIC) मध्ये विमा अभिकर्ता म्हणून कार्यरत सुनील शामराव नागपुरे (Code-0141399K) यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठित MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे सुनील नागपुरे यांची वणी शाखेतून सलग सातव्यांदा MDRT साठी निवड झाली आहे. MDRT बहुमान प्राप्त सुनील नागपुरे यांना अमेरिकेत होणाऱ्या मिलियन डॉलर राउंड टेबल कॉन्फ्रेंसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
भारतीय जीवन विमा निगम (LIC) ही विमा क्षेत्रातील सर्वात मोठी आणि विश्वासू कंपनी आहे. एलआयसीने ठरविलेल्या निकषाप्रमाणे विमा पॉलिसी विकणाऱ्या अभिकर्त्याना एमडीआरटी होण्याचा बहुमान प्राप्त होतो. यासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर कालावधीमध्ये तब्बल 5 ते 6 कोटी विमाधनची विमा पॉलिसी अभिकर्त्याना विकावी लागते. सुनील नागपुरे यांनी विकास अधिकारी बी.बी. विटाळकर यांच्या मार्गदर्शनात एलआयसीने दिलेले टार्गेट पूर्ण करून हा बहुमान मिळविला आहे.
त्यांच्या या यशामुळे भारतीय जीवन विमा निगम वणी शाखेचे शाखाधिकारी अजय गेडाम, सहा. शाखाधिकारी योगेश रणदिवे, विकास अधिकारी बी.बी. विटाळकर व शाखेतील अधिकारी, कर्मचारीवृंद यांनी सुनील गेडाम यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
सुनील नागपुरे यांचा अल्प परिचय … !
सुनील शामरावजी नागपूरे यांनी वणी तालुक्यातील भालर सारख्या खेडे गावातून विमा व्यवसायची सुरुवात केली होती. विमाधारक ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा आणि योग्य नियोजनामुळे त्यांनी आज विमा क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे. ग्रामीण भागातून व्यवसाय करीत सलग 7 वेळा MDRT सारखा प्रतिष्ठीत बहुमान मिळविणारे सुनील नागपुरे हे वणी शाखेतील एकमेव अभिकर्ता आहे. एवढेच नव्हे तर सुनील नागपुरे यांना 15 वेळा शतकवीर होण्याचा मान देखील प्राप्त झाला आहे. सुनील नागपुरे यांना जीवन विमा क्षेत्रात पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा….!