जितेंद्र कोठारी, वणी : अवैध मटका जुगार विरुद्द वणी पोलिसांनी शहरात धाडसत्र राबवून 24 तासात 11 ठिकाणी मटका जुगार खेळवताना 10 जणांना अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून 14 हजार 620 रुपयांचा रोख व मुद्देमाल जप्त केला. उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल बेहरांनी यांचे आदेशानुसार पोलीस पथकाने 29 मार्च रोजी सायंकाळ पासून तर 30 मार्च रोजी सायंकाळ पर्यंत शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकली.
पोलिसांनी 29 मार्च रोजी सायंकाळी 7.10 वाजता एकतानगर बस स्टॉप जवळ मटका पट्टी फाडतांना सैयद हमीर सैयद कादिर, मोमिनपुरा याला ताब्यात घेऊन त्याच्या कडून वरली मटका साहित्य, व नगद 860 रुपये जप्त केले. त्याचप्रमाणे भाजीमंडी येथून अमित गणेश गिरी, भाग्यशाली नगर (750 रु.), दीपक चौपाटी येथून आसिफखान जमालखान, शास्त्रीनगर (1680 रु.), शेख जावीद शेख साबीर (1520 रु.) सिंधी कॉलोनी मनोहर बार जवळ अब्दुल मतीन अब्दुल मजीद , पंचशील नगर (890 रु.), पंचशील नगर येथे सलीम शेख शेख सलीम, रा. मोमिनपुरा (6000 रु.), भाजीमंडी शौचालय जवळ अमित गणेश गिरी रा. भाग्यशाली नगर (850रु.), एकता नगर नगर परिषद कॉम्पलेक्स जवळ शाहीद अली कासीम अली, रा. एकता नगर (540 रु.), जानु अनिल शिंगाडे रा. साई नागरी (540 रु.), जत्रा मैदान परिसरात खुल्या जागेवर अमित संतोष झाडे, रा. रंगनाथ नगर (480 रु.) आणि प्रज्वल किशोर वासेकर रा. रंगनाथ नगर जवळून 510 रुपये असे एकूण 14 हजार 620 रुपये जप्त केले.
सदर धाडसत्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पो.उप नि. सुदाम आसोरे, विशाल सुनील गेडाम, श्याम परसराम राठोड, मो.वासिम, पंकज उंबरकर, गजानन कुडमेथे, विकास धड्से यांनी राबविले.