वणी टाईम्स न्युज : दोन महिन्यापूर्वी वणी येथील जिल्हा परिषद कॉलनीत तसेच शिरपूर पोलीस ठाणे हद्दीत सुंदरनगर येथे झालेल्या घरफोडीच्या घटनेचा उलगडा करण्यात एलसीबी पथकाला यश आला आहे. पोलिसांनी दोन चोरट्या अटक करून त्यांच्या ताब्यातून 119.120 मी.ग्रा. सोन्याचे दागिने किंमत 10 लाख 36 हजार रुपये व 3 मोबाईल किंमत 21 हजार जप्त केले आहे. पंकज राजु गोंडाने (28) रा. चवरे नगर सुतगिरणी रोड, अमरावती व सागर जनार्धन गोगटे (34) रा. गांधी चौक तुळजागीरवाला अमरावती ह.मु. यादगार नगर कारंजा, जि. वाशिम असे अटकेतील चोरट्यांचे नाव आहे.
दिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री दरम्यान वणी येथील जिल्हा परिषद कॉलनीतील गोपाल बाळकृष्ण भुसारी यांच्या घरात प्रवेश करून त्यांची आई कमलबाई भुसारी यांचे 9 तोळा सोन्याचे दागिने व 45 हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले होते. तसेच दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी गोपाल बाळकृष्ण भुसारी यांचे सुंदरनगर येथील वेकोलि क्वार्टरमध्ये चोरट्याने भरदिवसा 24 ग्राम सोन्याचे दागिने व 40 हजार रोख लंपास केले होते. सदर दोन्ही घटनेबाबत वणी व शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद आहे.
जिल्ह्यात चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये सतत वाढ झाल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हा शाखा यांना सदर गुन्हे तत्काळ उघडकीस आणणे करिता आदेश दिले. आदेशानुसार एलसीबी प्रमुख पीआय सतीश चवरे यांचे मार्गदर्शनात एपीआय संतोष मनवर, एपीआय गजानन गजभारे, पीएसआय धनराज हाके यांनी एलसीबी स्टाफच्या मदतीने सदर चोरीचे गुन्हा उघडकीस आणले.