वणी : चोरी सारखा गुन्हा घडविण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या लपून बसलेल्या इसमास शिरपूर पोलिसांनी अटक केली. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत शिंदोला येथील बस स्थानक परिसरात 14 डीसे. रोजी रात्री 1 वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. सुहास उत्तम टेकाम (29) रा. कुर्ली ता. वणी असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.
शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि संजय राठोड स्टाफसह शिंदोला परिसरात नाईट पेट्रोलिंग करीत होते. रात्री 12.50 वाजता दरम्यान शिंदोला बस स्थानक परिसरात अंधारात एक इसम स्वतःचे अस्तित्व लपवून बसून दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अंधारात लपून बसून असल्याचा कारण विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
सदर इसम हा चोरी सारखा गुन्हा घडविण्याच्या उद्देशाने लपून बसल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. फिर्यादी नापोका अरविंद झोड यांच्या तक्रारीवरून आरोपी सुहास उत्तम टेकाम विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.