वणी टाईम्स न्युज : महसूल पथकाने रेतीची चोरटी वाहतूक विरुद्ध काही केल्याने तस्करी थांबण्याचा नाव घेताना दिसत नाही. शनिवार 3 मे रोजी भरदिवसा शहराचे मध्यभागी अवैध रेती भरलेले हायवा रिकामे होत असताना महसूल व पोलीस प्रशासन रजेवर आहे की काय ? असा प्रश्न निर्माण झाला होता. तहसीलदार निखिल धुळधर यांचे भावाचे लग्न असल्याने ते रजेवर आहे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने महसूलचे पथक शिंदोला, कलमना, कोरपना सीमेवर तस्करांची वाट पाहत होते. तर इकडे दिवस भर शहरात उमेशचे हायवा रेती रिकामे करुन धावताना दिसले.
काही दिवसांपूर्वी तहसीलदार निखिल धूळधर यांनी मध्यरात्री पाटाळा पुलाजवळ स्वतः रेती घाटावर धाड टाकून एक पोकलेन मशीन व हायवा जप्त केला. त्यावेळी उमेश हा घाटावर हजर होता. त्यानंतर महसूल पथकाने अनेक कारवाई करून हायवा, ट्रक व ट्रॅक्टर जप्त केले. तरी पण रेती तस्कर धजावत नसल्याचे दिसून येत आहे.
शनिवारी देशमुखवाडी परिसरात एका मोठ्या गोडाऊन असलेल्या परिसरात सायंकाळी 6 वाजता हायवा क्रमांक MH34 BG 9176 रेती खाली करुन जात असताना फोटो व व्हिडिओ वणी टाइम्सचे हाती लागले आहे. आता महसूल पथक ती रेती जप्त करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील नांदेपेरा मार्ग व घुग्गुस मार्ग हे रेतीचे वाहने प्रवेश करण्याचे मुख्य मार्ग आहे.
या मार्गातून आलेले रेतीचे ट्रक, ट्रॅक्टर विठ्ठलवाडी, रवीनगर, आनंद नगर, देशमुख वाडी, जिल्हा परिषद कॉलनी, पटवारी कॉलनी, लालगुडा, वाघदरा, जत्रा रोड या भागात रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती आहे. रेती तस्करांचे महसूल खात्यातील काही शुक्राचार्यांसोबत मधुर संबंध असल्याने भरदिवसा रेती वाहतूक करण्याचे धाडस करीत असल्याचेही बोलले जाते.
रेती तस्करीसाठी 80×20 चा फॉर्म्युला
रेतीचा तुटवडा असल्यामुळे अनेक ठिकाणी बांधकामात क्रशर डस्टचा वापर होत आहे. क्रेशर डस्ट हा फिनिश प्रोडक्ट असल्यामुळे वाहतुकीसाठी रॉयल्टी ची गरज नाही. नेमक याचाच फायदा घेऊन ट्रॅक्टरने रेती तस्करी करणाऱ्यांनी 80×20 चा फार्मूला लागू केला आहे. अवैधरित्या रेती घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये खाली 80 फूट रेती तर त्याचा वर 20 फूट क्रेशर डस्टचा लेयर पसरविला जाते. जेणेकरून महसूल किंवा पोलीस पथकाने ट्रॅक्टर थांबविल्या त्यामध्ये डस्ट असल्याचे दाखवून ट्रॅक्टर पास केल्या जात आहे.