वणी टाईम्स न्युज : तीन दिवसांपूर्वी 27 मार्च रोजी यवतमाळ मार्गावर बाकडे पेट्रोल पंप जवळ डॉ. झाडे हॉस्पिटल समोर गंभीर अवस्थेत आढळलेल्या अनोळखी इसमाचा नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाला. सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून त्या व्यक्तीला मारहाण करून खून करणाऱ्या सराईत गुन्हेगार अनिकेत दादाराव कुमरे, रा. सिंधी, ता. मारेगाव याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी यांनी दारूच्या नशेत सदर इसमाला बेदम मारहाण केली. परंतु मारहाणीत मृत झालेल्या व्यक्तीला ओळखत नसल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.
आरोपी अनिकेत कुमरे यांनी ऑगस्ट 2023 मध्ये वणी तहसील कार्यालयाच्या मागे एका अनोळखी इसमाची निघृण हत्या केली होती. आरोपी काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला आणि त्यांनी पुन्हा एका अनोळखी इसमाचा खून केला. मृत व्यक्ती हा अंदाजे 45 ते 50 वर्षाचा असून परिसरातून हरविलेले इसमाबद्दल किंवा मृतक इसमाला कोणी ओळखत असेल तर त्यांनी पोलीस निरीक्षक पो. स्टे. वणी गोपाल उंबरकर, मो. नं. 8788577840 किंवा तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक अश्विनी रायबोले मो. नं. 8766083544 या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.