दुचाकी स्लीप होऊन चालकाचा मृत्यू
वणी टाईम्स न्युज : महाप्रसादासाठी पिठगिरणीवरून दळण आणण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या तरुणाचा दुचाकी स्लीप होऊन मृत्यू झाला. सदर घटना तालुक्यातील साखरा ते साखरा पौड दरम्यान 14 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता दरम्यान घडली. विकास अनिल आत्राम (28) रा. साखरा पौड असे मृतक दुचाकी चालकाचे नाव आहे. फिर्यादी कैलाश प्रभाकर आत्राम याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अंधारात लपून बसलेल्या इसमाला अटक
वणी पोलीस रात्री पेट्रोलिंग करीत असताना रामपूरा वार्ड येथे अनिल कृषी केंद्र देरकर यांचे घराजवळ एक इसम अंधारात संशयास्पदरित्या फिरताना दिसून पडला. पोलीस वाहन दिसताच सदर इसम पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडला. त्याले नावपत्ता विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी आपले नाव शरीफ आरिफ शेख (30) रा. वैदयनगर यवतमाळ सांगितले. सदर इसम हा चोरी करण्याच्या उद्देशाने लपून असल्याच्या संशय वरून पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला.
शेताच्या रस्त्यावरून वाद करून हल्ला
शेतात येण्या जाण्याच्या कारणावरून शेत शेजारी बाप लेकाने वाद घालून धारदार वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना रविवार 15 सप्टे. रोजी शिरगिरी शेत शिवारात घडली. फिर्यादी गणेश महादेव मोरे (40) रा. उमरी, ता. वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी चंद्रभान विठ्ठल खिरटकर आणि अमित चंद्रभान खिरटकर रा. उमरी विरुद्ध कलम 118(1), 351(2), 351(3), 352 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.