वणी टाईम्स न्युज : तालुक्यात रेती तस्करीला ऊत आले असून पैनगंगा नदी पात्रातून रात्रंदिवस रेती उपसा करुन ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक रेतीची तस्करी सुरू आहे. शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील साखरा (कोलगाव) शिवारात पैनगंगा नदीतून रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहितीवरुन महसूल विभाग व शिरपूर पोलिसांनी थेट रेती घाटावर धाड टाकली. मंगळवार 25 मार्च रोजी राबविण्यात आलेल्या या कारवाईत संयुक्त पथकाने रेती भरलेला एक ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली.
पथकाने रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला विचारणा केली असता त्यांनी आपले नाव मंगेश महादेव वेटे (26) रा. चिखली असे सांगितले. तसेच ट्रॅक्टर मालक अमित शांताराम जुनघरी (32) रा. जुगाद, ता. वणी यांच्या सांगण्यावरून अवैधरीत्या विना परवाना रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती दिली. सदर रेतीची वाहतूक बेकायदेशीर असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH34 BR 3198 व त्याला लागून असलेली लाल रंगाची ट्रॉली ज्याची किंमत 5 लाख रुपये तसेच ट्रॉली मध्ये भरलेली रेती 1 ब्रास किंमत 6 हजार असे एकूण 5 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी यांनी स्वताच्या फायद्याकरिता अवैधरीत्या विना परवाना गौण खनिज उत्खनन करुन पर्यावरणास हानी पोहचवुन पैनगंगा नदी पात्रातुन रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने मंगेश महादेव वेटे रा. चिखली तसेच ट्रॅक्टर मालक अमित शांताराम जुनघरी विरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात कलम 303 (2), 3(5) बी.एन.एस. सहकलम पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 15 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 कलम 48(7) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.