वणी टाईम्स न्युज : सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा वणीचा 7 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाप्रसंगी दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान वणी शाखेत करण्यात आला. यावेळी सामाजिक दायित्व म्हणून शाखेतर्फे शिरपुर व वणी पोलीस स्टेशनला 5 रोड बॅरिकेट्स भेट देण्यात आले.
गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांचे उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसा.लि. या रोपट्याचे रूपांतर एक मोठ्या वटवृक्षात झाले आहे. वर्धापन दिवस कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना राकेश खुराणा यांनी सांगितले की गोदावरी अर्बन ही सोसायटी प्रगती पथावर असुन त्यात वणी शाखेचे मौलिक योगदान आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद अर्बन को. ऑप बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा, प्रमुख अतिथी सहा. पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले, शाखा व्यवस्थापक विजय मोडक हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजु गव्हाणे, प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक विजय मोडक यांनी तर आभार सुरज चाटे यांनी मानले.