वणी टाईम्स न्युज : भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या बातमीचा भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी खंडन केला आहे. भाजप कार्यालयात असा कोणताही प्रकार घडला नाही. अशी माहिती खुद्द जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंगळवारी रात्री भाजप प्रचार कार्यालय उद्घटनात मी स्वतः हजर होतो, मात्र अशी कोणतीही घटना घडली नाही. असा खुलासा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकारांसमोर केला.
भाजप कार्यालयात अशी कोणतीही घटना घडल्याची त्यांना माहिती नसून समाज काही माध्यामंवर त्यांना जबाबदार ठरविण्यात येत आहे. निवडणूक काळात हा जातीय तेढ करण्याचा तसेच त्यांची प्रतिमा खराब करण्याचा हा विरोधकांचा षडयंत्र असल्याचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकारांना सांगितले. राजकीय जीवनात त्यांनी कोणत्याही समाजाप्रती कधीही चुकीचे वक्तव्य केले नाही.
वणी विधानसभेत बहुसंख्यांक असलेले कुणबी मतदारांच्या आशीर्वादाने मी दोनदा आमदार झालो. परंतु एका विशिष्ट समाज माध्यमावर माझ्यावर अनर्गल आरोप लावण्यात येत आहे. त्याच्यावर मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे. असे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकरराव पावडे, रवी बेलूरकर, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते उपस्थित होते.