वणी टाईम्स न्युज: एखाद्या शासकीय किंवा खाजगी प्रकल्पासाठी आवश्यक असलेली शेतजमीन खरेदी करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची मर्जी विचारली जात नाही. पूर्वजांनी घाम गाळून खरेदी केलेली शेत जमीन विकण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला तर त्याला देशद्रोही अथवा देशाच्या विकासासाठी बाधक घोषित केल्या जातो. शेतकऱ्यांची मर्जी नसताना शासन अध्यादेश लागू करुन बळजबरीने शेतीची जमिनीचे अधिग्रहण केल्या जाते. मात्र त्याच ठिकाणी एखाद्या नेता, मंत्री, उद्योगपती अथवा धनदांडग्यांची प्रॉपर्टी, बंगला, फार्महाऊस असेल तर त्यासाठी संपूर्ण प्रकल्प रद्द केल्या जातो अथवा त्याचा नकाशा बदलवायला भाग पाडल्या जाते. स्वतःची जमीन विकण्यासाठी धनदांडग्यांची मर्जी चालते तर शेतकऱ्यांची मर्जी का नाही ?
असा परखड प्रश्न उपस्थित केला आहे नुकतेच रिलीज झालेल्या जॉली एलएलबी-3 या सिनेमात. अक्षय कुमार व अर्शद वारसी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात भरपूर कॉमेडीसह शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. उद्योगपतींनी उभारणाऱ्या प्रकल्पासाठी सरकारमधील मंत्री, नेता तसेच प्रशासनिक अधिकारी व दलाल कशाप्रकारे शेतकऱ्यांवर दबाव आणतात, विविध प्रलोभने दाखवतात आणि शेवटी आत्महत्या करण्यास भाग पाडतात. याचा सुंदर चित्रीकरण या सिनेमात करण्यात आला आहे.
😭 मुव्हीचे शेवटचे सीन रडायला भाग पाडणार..!
बळजबरीने शेती अधिग्रहण केल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी राजाराम यांची विधवा पत्नी जानकी देवी हिचा न्यायालयामध्ये विलाप करण्याचा दृश्य अत्यंत भावूक करणारा आहे. जेव्हा वकील असलेले अर्शद वारसी न्यायाधीश यांना विचारणा करतात की, खेतान साहेब, विक्रम राय आणि तुमची मर्जी चालु शकते, तर शेतजमिनीची मालकीण जानकी राजाराम सोलंकी हिची मर्जी का ग्राह्य धरत नाही ?
🔊 सिनेमाची पार्श्वभूमी ..?
या सिनेमाची पार्श्वभूमी उत्तरप्रदेश राज्यात 7 मे 2011 मध्ये घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे. गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील भट्टा परसौल गावात जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावर गावकरी व पोलिस यांच्या झालेल्या हिंसक संघर्षात 2 पोलीस व 2 स्थानिक शेतकरी मारले गेले होते. याच पार्श्वभूमीवर निर्देशक शेखर कपूर यांनी जॉली एलएलबी-3 मुव्ही बनवली आहे.
👉 एकदा अवश्य पाहा जॉली एलएलबी-3
वणी शहरातील एअरकंडिशन्ड व उत्तम आसन व्यवस्था असलेल्या सुजाता थिएटरमध्ये जॉली एलएलबी-3 सिनेमाचे 4 शो सूरू आहे. बुक माय शो या ऍप्लिकेशन सह तुम्ही टाकीजवर जाऊन ही तिकीट खरेदी करू शकतात. संपूर्ण परिवारासह पाहण्यासारखी ही मुव्ही एकदा जरूर पाहा.