वणी : दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा समाज कल्याण विभाग यवतमाळ यांच्यावतीने 18 व 19 मार्च 2024 रोजी नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे दिव्यांग मुलं मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वणी येथील रामदेव बाबा मूकबधिर व मतिमंद विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त पदक मिळवून जिल्ह्यात प्रथम स्थान पटकाविले. रामदेवबाबा शाळेतील स्पर्धकांनी 12 गोल्ड मेडलसह 11 सिल्व्हर आणि 8 कांस्य पदक जिंकले.
या क्रीडा स्पर्धेमध्ये 50 ,100, 400 मीटर रेस, लांब उडी, गोला फेक, स्पॉट जंप, स्पॉट बॉल थ्रो असे वेगवेगळ्या वयोगटात ममता किनाके, अनिता आत्राम, चेतन सोनटक्के, रेखा यादव, विशाल गायकवाड, कामाक्षी चोपणे, दिव्या मडावी, सुजन कांबळे, श्रुती करडे, प्रांजल जाधव, गोपाल वाटेकर, श्रवण उपरे यांनी प्रथम स्थान पटकाविला. तर लक्ष्मी बावणे, अमन शेख, तनुश्री झाडे, कोयल राठोड, दक्ष केळझरकर, सिमरन कश्यप, दीप खोब्रागडे, वेदिका भोयर, शिवम हुसकुले यांनी द्वितीय आणि तृतीय स्थान पटकावून शाळेचे नाव लौकिक केले.
यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये मिळालेल्या यशाचे मानकरी शाळेचे मुख्याध्यापिका सरोज भंडारी शिक्षक चित्रा लारोकर, भारती हिवरे, प्रिया मिलमिले, प्रतिभा व कोमल मॅडम राहिले. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष मेघराज भंडारी यांनी विजयी खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले आहे.