वणी टाईम्स न्युज : विविध गुन्ह्यांमध्ये जप्त व वर्षोंवर्ष पासून पोलीस ठाण्याच्या आवारात भंगार अवस्थेत पडून असलेल्या 90 वाहनांचा आज जाहीर लिलाव करण्यात आला. वाहनाच्या लिलावातून शासनाच्या तिजोरीत 9 लाख 61 हजार रुपयांची भर पडली आहे. पोलीस स्टेशन येथील दक्षता भवन मध्ये आयोजित लिलाव प्रक्रियेत बोली लावण्यासाठी चंद्रपूर, यवतमाळ व वणी येथील मोठ्या संख्येने लिलाव घेणारे व्यापारी उपस्थित होते.
तहसीलदार निखिल धुळधर, ठाणेदार गोपाल उंबरकर व परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 71 दुचाकी वाहन व 19 ऑटो, कार, मेटाडोर, ट्रक असे एकूण 90 वाहनाचा लिलाव करण्यात आला. जुने व भंगार झालेल्या या वाहनाची परिवहन अधिकाऱ्यांनी 7 लाख 97 हजार 360 रुपये मूळ किंमत ठरविली होती. त्यानंतर लिलावात सहभागी व्यापाऱ्यांनी हात वर करून चढ्या भावाने बोली सुरु केली. शेवटी सोहेल अहमद शेख यांनी 9 लाख 61 हजार रुपये उच्चतम बोली लावून लिलाव पदरी पाडून घेतला.