वणी टाईम्स न्युज : भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गति देण्याच्या उद्देशाने रविवार 5 जानेवारी पासून राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान सुरु करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शनात राज्यात सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. वणी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नेतृत्वात रविवारी वणी शहरात भाजप सदस्यता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
माजी आमदार बोदकुरवार यांनी वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे, माजी जिल्हा महामंत्री रवि बेलूरकर, बीजेपी शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, व्यापारी आघाडी अध्यक्ष लवलेश लाल व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह शहरात फिरुन शेकडो नागरिकांची भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून नोंदणी केली.
भारतीय जनता पक्षाची सदस्यता ग्रहण करण्यासाठी आपल्या मोबाईल वरुन 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन विकसित भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे. विधानसभा मतदार संघात भाजप सदस्य नोंदणी मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली.