वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकारण्या तात्काळ आदेशाने बरखास्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून वणी विधानसभा मतदार संघातील वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संघटनाच्या सर्व सर्व अंगीकृत कार्यकारण्या बरखास्त करण्यात आली. या सर्व पदाकरिता लवकरच राज ठाकरे यांच्या हस्ते नवीन नियुक्त्या करण्यात येणार आहे. तरी पुढील नियुक्त्या होई पर्यत कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाकडे पदाचे अधिकार राहणार नाही. असे मनसे नेते राजु उंबरकर यांनी जाहीर केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.