वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय नीलकंठराव देरकर यांचे प्रचारार्थ आज 17 नोव्हेंबर रोजी वणी शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी शहराचे आराध्य दैवत श्री रंगनाथ स्वामी यांचे दर्शन करुन पदयात्रा गाडगेबाबा चौक, गांधी चौक, खाती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचणार आहे.
रविवारी दुपारी 1 वाजता सुरु होऊन सायंकाळी 5 वाजता पदयात्राचे समारोप होणार आहे. या यात्रेत खासदार संजय देशमुख यांचेसह महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहे. पद यात्रेच्या निमित्ताने महाविकास आघाडी उमेदवार निवडणूकीपूर्व शक्ती प्रदर्शन करणार आहे.
पदयात्रेत काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, मोरेश्वर पावडे, ॲड, देवीदास काळे, आशिष खुलसंगे, डॉ.महेंद्र लोढा, अरुणा खंडाळकर, मारोती गौरकार, राजु येल्टीवार, घनश्याम पावडे, मंगल मडावी, राकेश खुराणा, ओम ठाकूर, शालिनी रासेकर, शामा तोटावार, संध्या बोबडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (SPG) चे विजय नगराळे, आबिद हुसेन, सूर्यकांत खाडे, दिलिप भोयर, समाजवादी पार्टीचे रज्जाक पठाण, भाकपचे दिलिप परचाके, कुमार मोहरमपुरी, शिवसेना (उबाठा) नेते संजय निखाडे, दीपक कोकास, सुनिल कातकडे, संतोष माहुरे, शरद ठाकरे, रवी बोढेकर, योगिता मोहोड, डिमन टोंगे, वनिता काळे, गीता उपरे, राजु तुराणकर, प्रकाश कऱ्हाड, अनिल राजूरकर, मधुकर वरडकर, प्रविण आत्राम, अजय धोबे सहभागी होणार आहेत. पदयात्रेत सहभागी होऊन परिवर्तनाचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन मविआच्या वतीने करण्यात आले आहे.