वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड पार्टी तर्फे उमेदवारी दाखल करणाऱ्या अजय पांडुरंग धोबे यांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या निर्णयाची घोषणा केली. यावेळी अजय धोबे यांनी राज्यातून महायुतीची अनैतिक व शेतकरी विरोधी सरकार उखडून फेकण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.