जितेंद्र कोठारी, वणी : औषधांची खरेदी विक्री बाबतचे कायदे व औषध विक्री करताना काय काळजी घ्यावी याकरिता मेडिकल दुकानदारांना मार्गदर्शन करण्याकरिता एक दिवशीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. वणी केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोशियसनच्या वतीने 9 डिसेंबरला आयोजित या शिबिरात अन्न व औषध प्रशासन यवतमाळचे सहायक आयुक्त मिलिंद कालेश्वर यांनी मार्गदर्शन केले.
त्यांनी औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 मधील औषधांचे खरेदी व विक्री तसेच नार्कोटिक कायदा व DPCO बाबत सविस्तर माहिती दिली. ज्या औषधांचा गैरवापर होऊ शकतो अशा झोपेच्या व गर्भपातेच्या गोळ्या तसेच इतर शेड्युल औषधांची विक्री नियमाप्रमाणेच करावी अन्यता कडक कारवाई होऊ शकते. अशा इशाराही सहा. आयुक्त यांनी दिला. औषध विक्रीचे प्रत्येक दुकानावर सीसीटीव्ही केमेरा लावण्याची सूचनाही त्यांनी केली.
यावेळी यवतमाळ जिल्हा केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोशियसनचे अध्यक्ष पंकज नानवाणी, सचिव संजय बोरुले, उपाध्यक्ष अतुल ढोले, कोषाध्यक्ष गजानन बट्टावार, तसेच वणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण उरकुडे, सचिव जितेंद्र डाबरे, बाबाराव बोबडे, उज्ज्वल पांडे, प्रतिक कुंचमवार, विजय बुराण, श्रीकांत गारघाटे, लक्ष्मीकांत हेडाऊ, पंकज कासावार, अजय खटोड, अभिजित देरकर, शंकर तुराणकर, नामिष काळे, उमाकांत भोजेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज नानवाणी यांनी मांडले. संचालन जितेंद्र डाबरे व आभार प्रदर्शन लक्ष्मण उरकुडे यांनी केले.