वणी : अनेकांना बाहेर जाऊन चटकदार, चविष्ट खाण्याची मोठी आवड असते. त्यात शनिवार आणि रविवार आला, की अनेक जण खाण्यासाठी वेगवेगळ्या जागा, हॉटेल्सच्या शोधात असतात. त्यात एखादा नॉन-व्हेज प्रेमी (Non-Veg Hotels) असेल, तर त्यासाठी एकदम ऑथेंटिक मांसाहारी हॉटेल सोने पे सुहागाचं ठरतं. अशात चमचमीत आणि ऑथेंटिक मांसाहारी हॉटेलच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी सुप्रसिद्ध ‘वेदा फॅमिली रॅस्टोरंट’ एक मेजवानी ठरणार आहे. शहरातील शेवाळकर परिसरात सुप्रसिद्ध ‘वेदा फॅमिली रॅस्टोरंट’ मध्ये व्हेजसोबत आता नॉनव्हेज जेवणाचाही आस्वाद घेता येणार आहे. खास मांसाहारी खवय्यांसाठी रविवार 17 डिसेंबर पासून वेदा रॅस्टोरंटमध्ये स्वतंत्र नॉनव्हेज किचन सुरु करण्यात येत आहे.
शहरात नॉनव्हेज शौकिनांची संख्या लक्षात घेता वेदा रॅस्टोरंटमध्ये नॉनव्हेज थाळी सुरु करण्याचे संचालकांनी ठरविले आहे. यात व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही डिशमध्ये कॉम्बो ऑफर वेदा रॅस्टोरंटतर्फे सादर करण्यात आले आहे. नॉनव्हेज कॉम्बो ऑफर मध्ये 499 रुपयात अनलिमिटेड जेवण ग्राहकांना मिळणार आहे. त्यात स्टार्टरमध्ये चिली चिकन, चिकन 65, तंदुरी चिकन, फिश फ्राय, चिली पनीर, चिली चना, नुडल्स, मन्चुरिअन, मंचाऊ सूप तसेच मेन कोर्समध्ये चिकन, पनीर, व्हेजीटॅरीअन दाल, राईस, रोटी, सलाड, पापड, आचार मिळणार आहे. तर व्हेज कॉम्बो पॅकमध्ये फक्त 399 रुपयात वेज मंचाऊ सूप, क्रिस्पी चिली बेबीकॉर्न, चिली पनीर, मंचूरीअन, चिली चना, नूडल्स, फ्रेंच फ्राय, पनीर टिक्का, टोमेटो सूप, पनीर सब्जी, तडका दाल, राईस प्लेट, रोटी, सलाड, पापड, आचार, मनसोक्त खाण्यास मिळणार आहे. शिवाय ऑनलाईन होम डिलिवरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बर्थडे पार्टी, फॅमिली व ग्रुपसाठी बसण्याची खास व्यवस्था
लाईव्ह किचन व संपूर्ण वातानुकुलीत असलेले शहरातील एकमात्र वेदा रॅस्टोरंटमध्ये बर्थडे पार्टी, फॅमिली पार्टी, बिजनेस ग्रुप साठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रॅस्टोरंटमध्ये तळमजल्यावर किचन तर फर्स्ट फ्लोर व सेकंड फ्लोरवर ग्राहकांना बसण्याची व्यवस्था आहे. शिवाय रॅस्टोरंटच्या बाहेर खुल्या हवेत (open air) बसूनसुद्धा जेवण करता येणार आहे.
दर्जा आणि चव हीच आमच्या येथील जेवणाचे वैशिष्ट्ये आहे. वेदा रॅस्टोरंटमध्ये जेवण म्हणजे समाधान आणि निखळ आनंद. एकवेळ अवश्य भेट द्या – अखिल सातोरकर (संचालक- वेदा रॅस्टोरंट)
पत्ता: वेदा व्हेज अंड नॉनव्हेज फॅमिली रॅस्टोरंट
राम शेवाळकर परिसर, यवतमाळ रोड, वणी
संपर्क : 9730894567