वणी टाईम्स न्युज : निराधार तसेच मानसिक स्थैर्य गमावलेल्या एका तरुणाला पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने नवा आधार मिळाला आहे. वणी टाईम्सने केलेला पाठपुरावा आणि पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचा पुढाकाराने शहरातील रस्त्यावर फिरत दहशत निर्माण करणाऱ्या त्या मनोरुग्ण युवकाला यवतमाळ येथील नंददीप फाऊंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. जिथे मानसोपचार चिकित्सक डॉ.श्रीकांत मेश्राम त्याच्यावर उपचार करीत आहे.
उल्लेखनीय आहे की मागील काही दिवसांपूर्वी एका मनोरुग्ण युवकाच्या हिंसक उपद्रवामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले होते. टिळक चौक येथे उभ्या एका वकिलाच्या थार वाहनाची दगड मारून काच फोडल्यानंतर त्याची दहशत पसरली होती. सदर घटना आणि त्यानंतरही वणी टाईम्स न्यूजने सदर मनोरुग्ण युवकापासून नागरिकांना धोका व त्या युवकाला मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याबाबत बातम्या प्रकाशित केली.
वणी शहरात परप्रांतीयांची वाढती गर्दी; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
याबाबत वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पो. नि. गोपाल उंबरकर यांनी पुढाकार घेऊन सदर मनोरुग्ण युवक जो स्वतः आपला नाव प्रभुजी सांगत होता, त्याला पोलीस वाहनात बसवून यवतमाळ येथे नेऊन नंददीप फाऊंडेशन येथे दाखल केले. नंददीप संस्था ही मनोरुग्णांचे उपचार करून त्यांचे पुनर्वास करण्यास मदत करीत असते. त्या ठिकाणी प्रभुजी यांचे उपचार सुरु असून तो हळूहळू नॉर्मल होत आहे.