वणी : शहरातील वार्ड क्रमांक 17 मध्ये अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त महिलांनी वणी पोलीस ठाण्यावर धडक देऊन दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. वंचित बहुजन आघाडी महिला मोर्चा तालुका महासचिव प्रणिता ठमके यांच्या नेतृत्वात वार्डातील शेकडो महिलांनी ठाणेदार यांना निवेदन देऊन अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली.
शहरातील वार्ड क्रमांक 17 मधील रहिवासी एक इसम वार्डात अवैधरित्या दारूची विक्री करीत आहे. दारू सहज उपलब्ध होत असल्याने अल्पवयीन मुलानासुद्दा दारूचे व्यसन जडत आहे. शिवाय दारू पिण्यासाठी आलेले दारुडे अश्लील भाषेचा वापर व महिलांकडे वाईट नजरेने बघत असतात. त्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
वणी पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. दत्ता पेंडकर यांना निवेदन देताना वंचित महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शारदा मेश्राम, जिल्हाउपाध्यक्षा अर्चना कांबळे, शहराध्यक्षा अर्चना नगराळे, वॉर्ड अध्यक्षा प्रिया काटकर, जिल्हा संघटिका नंदिनी ठमके, प्रतिमा मडावी, लता पाटील, विमल तामगाडगे, सविता तांबे, सुषमा मोडक, कल्पना काळे, शिल्पा काळे, तारा मोडक, नलिनी मोडक, कमल मोडक, ज्योती मोडक, स्वाती मोडक, अंजना मोडक, संगीता मोडक, सुनंदा मोडक, स्वप्ना मोडक, अनिता गट्टेवार, वैशाली टिपले, पुष्पा बावणे, अजिदा शेख, सुषमा बावणे, यांचेसह वणी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप भोयर जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, महासचिव मिलिंद पाटील, शहराध्यक्ष किशोर मुन, युवा आघाडीचे शहराध्यक्ष विशाल कांबळे, वृषभ शेख, निरज मोडक, राजू गजरे, विलास तेलतुंबडे, उपस्थित होते.