वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून रविवारी वणी येथे आयोजित रोजगार महोत्सव मेळाव्यात नोकऱ्याचा पाऊस पडला. या मेळाव्यात वणी विधानसभा मतदार संघातील सहा हजारहून अधिक सुशिक्षित बेरोजगार तसेच कुशल युवक युवतींना नामांकित कंपन्यामध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. मेळाव्यात देशातील 75 पेक्षा जास्त उद्योग, सेवा व खाजगी क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तर तब्बल 13 हजार उमेदवारांनी नोकरीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी केली होती.
येथील शिक्षण प्रसारक मंडळ (SPM) शाळेच्या प्रांगणात आयोजित मनसे रोजगार महोत्सवात टाटा मोटर्स, महिंद्रा अंड महिंद्रा, एसबीआय बँक, एक्सिस बँक, वैद्यनाथ, हायर, फोनपे, पेटीएम, नवभारत, AU स्माल फायनान्स, BSA, सहयोग बँक, ओप्पो, विवो सारख्या कंपन्याने सहभाग नोंदविला. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर सदर कंपन्यांचे प्रतिनिधीकडून इंटरव्यूह घेण्यात आले. इंटरव्यूहमध्ये उत्तीर्ण अर्जदारास कार्यक्षेत्र आणि वेतन माहितीसह तत्काळ जॉईनींग लेटर देण्यात आले. काही कंपन्यांनी नियुक्ती राखून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना टप्याटप्याने नियुक्ती पत्र देण्यात येईल.
वणी येथे मनसेच्या वतीने पार पडलेले भव्य दहीहंडी महोत्सव दरम्यान मनसे नेते राजू उंबरकर यांनी वणी विधानसभा मतदार संघातील 5 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन दिले होते. त्या अनुषंगाने मागील दोन महिन्यापासून प्रचार प्रसारसह रोजगार मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मनसेकडून वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यात मुलाखतपूर्व प्रशिक्षण शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा फायदा इंटरव्यूह देताना अर्जदारांना झाला. विविध कंपन्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मनसे नेते राजू उंबरकर व मान्यवरांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. मनसे रोजगार महोत्सव मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी राजू उंबरकरसह मनसे कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
नोकरी मिळालेल्या युवकांचा आनंद पाहून आत्मिक समाधान
वणी विधानसभा क्षेत्र हा माझा कुटुंब आहे. शासन व लोकप्रतीनिधीच्या उदासीन धोरणामुळे या भागात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. विधानसभा क्षेत्रातील सुशिक्षित, कुशल, बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार देण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. मनसे रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या युवकांच्या चेहऱ्यावरील आनंद हा माझ्यासाठी आत्मिक समाधान देणारा आहे. रोजगारी मेळाव्याला मिळालेले प्रतिसाद पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी रोजगार महोत्सव आयोजित करण्याचा मानस आहे.
राजू उंबरकर, नेते- महाराष्ट्र नवनिर्माण सेना
पहा विडियो :-