वणी टाईम्स न्युज : आगामी एक दोन महिन्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूका पार पडणार आहे. त्याआधीच राजकीय पक्षातील नेतेमंडळी व काही सामाजिक संघटनांची जनतेमध्ये आपली उपस्थिती दर्शविण्याची जणू होड लागली आहे. विविध समाजातील धार्मिक कार्यक्रमात या लोकांचा सहभाग वाढला आहे. शिवाय ठिकठिकाणी आरोग्य शिबीर, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. जनतेच्या प्रश्नांना घेऊन प्रशासनाकडे निवेदने व आंदोलनाची भाषा अनेक राजकीय नेते व संघटना करू लागले आहे.
वणी उप विभागात प्रदूषण, ओव्हरलोड वाहतूक, रस्त्यांची दुरवस्था, बेरोजगारी, पिण्याचे शुद्ध पाणी अशी अनेक समस्या आहे. मात्र साडे चार वर्ष जनतेची सुध न घेणारी नेतेमंडळी व सामाजिक संघटना निवडणुकीची चाहूल लागताच स्वतःला जनसेवेच्या कार्यात वाहून घेताना दिसत आहे. कुणी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तर कुणी रस्त्यावर ब्रेकर लावण्याची मागणी करीत आहे. कुणी बांधकामाची चौकशीची मागणी करीत आहे तर कुणी अवैध उत्खनन न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देत आहे.
मागील दोन तीन महिन्यापासून तर काही नेत्यांमध्ये समाजसेवेची स्पर्धा लागली की काय ? असा अनुभव नागरिकांना येत आहे. मात्र या सेवाच्या मागे मेवा खाण्याचा हेतू जनतेला कळते, अशी जाण या मंडळीला असायला हवे. साडे चार वर्ष मतदारांना आपले तोंड न दाखविणारे काही महाभाग निवडणुकांच्या तोंडावर स्वतला शेतकऱ्याचा कैवारी असल्याचा आव आणत आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमात्र अशा पक्ष आहे, जे नागरिकांच्या समस्येबाबत सतत सक्रिय भूमिकेत दिसून पडते. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या असो, आरोग्याचे प्रश्न असो की, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमेचा विषय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात तत्पर असते. निवडून आले किंवा नाही, राजकारणाचे पलिकडे जाऊन मनसे नेते राजु उंबरकर अनेक गोर गरीब व शेतकरी कुटुंबाची मदतही करतात.