वणी टाईम्स न्युज : नवरात्र उत्सव दरम्यान शहरातील आंबेडकर चौक येथील प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरात हरियाणा कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत प्रज्वलीत करुन आणण्यात आली आहे. या अखंड ज्योतीचे दर्शनासाठी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे गुरुवार 25 सप्टेंबर रोजी दुर्गामाता मंदिरात भेट देणार आहेत. यावेळी सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता महाआरती होणार आहे.
शहरातील आंबेडकर चौक येथील प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरात दरवर्षी एक शक्ती पीठातून मातेची अखंड ज्योत आणली जाते. पहील्या वर्षी माहूर येथील रेणुका मातेची ज्योत व दुसऱ्या वर्षी तुळजापूर येथील माता तुळजाभवानी ची ज्योत भाविकांच्या दर्शनासाठी आणली गेली. या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी 22 सप्टेंबरला हरियाणा कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत प्रज्वलीत करुन आणण्यात आली आहे. या ज्योतीचे विधीपूर्ण स्थापना करुन त्यांचे पावित्र्य जपन करुन नवरात्र उत्सवाला मोठ्या श्रध्देने व उत्साहाने प्रारंभ झाला. ही ज्योत दुर्गा माता मंदिरात भाविक भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. रोज हजारो भाविक भक्त या पवित्र अखंड ज्योतीचे दर्शन घेत आहेत.
वणी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या गुरुवार 25 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत. सुधीर मुनगंटीवार यांचे आगमनानिमित्त व महाआरतीला भाविक भक्तांनी दुर्गा माता मंदिरात उपस्थित रहावे. असे आवाहन दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी केले आहे.