वणी टाईम्स न्युज : भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा तर्फे सेवा पंधरवाडा 2025 या उपक्रमांतर्गत “नमो युवा रन” या व्यसनमुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच लोकमान्य टिळक चौक वणी येथून सुरु होणार आहेत.
या मॅरेथॉनमध्ये 16 वर्षांखालील मुले-मुलींसाठी 2.5 किमी धाव आणि 16 वर्षांवरील स्पर्धकांसाठी 3.5 किमी धाव असे दोन गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गटातून तीन प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जाणार आहेत. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
🔻प्रथम पारितोषिक : ‘अ’ गट ₹ 3000/-, ‘ब’ गट ₹ 5000/-
🔻 द्वितीय पारितोषिक : ‘अ’ गट ₹ 2000/-, ‘ब’ गट ₹ 3000/-
🔻तृतीय पारितोषिक : ‘अ’ गट ₹ 1000/-, ‘ब’ गट ₹ 2000/-
या उपक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप शहर अध्यक्ष ऍड. नीलेश चौधरी, भाजप माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय चोरडिया, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, कुणाल चोरडिया, संजय पिंपळशेंडे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेत प्रवेश निःशुल्क असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधारकार्ड आणणे आवश्यक आहे. प्रवेश नोंदणी 25 सप्टेंबर रोजी सकाळी स्पर्धेच्या ठिकाणी केली जाईल, असे आयोजकांनी कळविले आहे.
👉 सेवा पंधरवाडा संयोजक लक्षणराव उरकुडे व सहसंयोजक स्मिता नांदेकर यांनी आवाहन केले आहे की, युवकांनी मोठ्या संख्येने या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन व्यसनमुक्त भारताचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहचवावा.