वणी टाईम्स न्युज :भारत स्वाभीमान ट्रस्ट, पतंजली महिला योग समिती वणी तसेच आमदार वणी विधानसभा क्षेत्र यांचे वतीने दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन कल्याण मंडपम वणी येथे विविध कार्यक्रमासह संपन्न झाला. योग दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते पूजन व दीपप्रज्वलन नंतर आयुष मंत्रालय भारत सरकारच्या प्रोटोकॉलनुसार प्रार्थना, सुक्ष्म व्यायाम, विविध प्रकारची आसने, प्राणायाम, ध्यान, संकल्प व शांतीपाठ घेण्यात आला.
यावेळी पतंजली महिला योग समिती अध्यक्ष माया माटे, योग शिक्षिका ममता श्रीवास्तव, कुंदा सावसाकडे व त्यांच्या योग साधकांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करणारे व विविध आसने समाविष्ट असलेले योग नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. तर शारदा काकडे व जया हिकरे यांनी भजन गायन केले. योग शिबिरात सहभागी योग साधकांसोबत आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ही योगासन केले.
योग दिवस कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तावीक प्रा.महादेव खाडे यांनी केले तर मंचावर योगाचे नमूना सादरीकरण लक्ष्मण इद्दे, रमेश बोबडे, माया माटे व विजया दहेकर यांनी केले. दिगंबर गोहोकार, वसंतराव उपरे व ममता श्रीवास्तव यांनी योग साधकांना मार्गदर्श केले. कार्यक्रमाचे संचालन स्वप्ना पावडे यांनी व आभार प्रदर्शन लक्ष्मण इद्दे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रामराव गोहोकार, सुधाकरराव गारघाटे, गुलाब नितेश, राजकुमार पाचभाई, विजय ढाले, शारदा काकडे, रेखा बोबडे, संगीता चिकटे, उषा चिकटे, ज्योत्स्ना खोकले, सुषमा मोहितकर व योगसाधकांनी सहकार्य केले.