सुशील ओझा, मुकुटबन : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत मुकूटबन येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. यादरम्यान वेगवेगळे उपक्रम शाळेत राबविण्यात आले. 28 जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस तथा तिथी भोजन या उपक्रमाने शिक्षण सप्ताहाचे समारोप करण्यात आले.
शिक्षण सप्ताह उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सातही दिवस सहभाग नोंदविला. तर शनिवारला वृक्ष दिंडी काढण्यात आली. गेल्या आठ दिवसापासून सतत धार पाऊस सुरू असताना समारोपच्या दिवसी 140 विद्यार्थी उपस्थित राहून तीथी भोजनाचा आनंदोत्सव साजरा केला. शिक्षण सप्ताहाचे औचित्य साधून मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले.
शिक्षण सप्ताह आणि तिथीभोज निमित्त पालक शिक्षक सभेचे आयोजनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जय बजरंग शिक्षण संस्थेचे संचालक संकेत उदकवार, मुख्याध्यापिका ममता जोगी आरसीसीपीएल कंपनीचे प्रबंधक कांबळे मुख्याध्यापक सुरेश परचाके, प्रा. आश्रम शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर वैद्य, संस्थेचे संचालक श्रीहरी चेलपेलवार, प्रवीना काकरवार, पालकवर्ग व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुनवटकर यांनी मांडले तर संचालन सुनील ढाले यांनी केले.