वणी : शहरात दुचाकी चोरीच्या घटना थांबण्याचा नाव घेत नाहीय. शहरातील हिराणी ले आउट मधून दोन मोटरसायकल चोरी गेल्याची तक्रार शुक्रवार 5 एप्रिल रोजी वणी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
फिर्यादी लुकेश बंडूजी कोहळे रा. हिराणी ले आउट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी आपली हिरोहोंडा पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक MH-29 AC 2391 गुरुवार 4 एप्रिल रोजी रात्रि घराच्या अंगणात ठेवून झोपले होते. मात्र सकाळी उठल्यावर मोटरसायकल अंगण्यात दिसून आली नाही. इकडे तिकडे शोध घेऊनही मोटरसायकल मिळून आली नाही.
दुसऱ्या घटनेत हिराणी ले आउट येथीलच राहुल पितांबर येसेकर यांनी गुरुवारी रात्री त्यांच्या घराच्या कंपाऊंडजवळ ठेवलेली त्यांची यामाहा कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH-29 AX 4626 रात्रीच्या वेळी चोरी गेल्याची तक्रार 5 एप्रिल रोजी वणी पोलीस ठाण्यात नोंदविली. गुरुवारी मध्यरात्री पटवारी कॉलोनीमध्ये झालेल्या दरोड्याच्या घटनेतील आरोपींनी दुचाकी चोरून नेल्या का ? पोलीस या दिशेनेही तपास करीत आहे.