वणी टाइम्स न्युज : सुखी संसारात ‘संशय’ व ‘मोह’ आला. ज्याने सात जन्माच्या शपथा घेतल्या तो देखील सासरच्यांची बाजू घेऊन छळ करू लागला. ज्या कुटुंबाला तिने गोकूळ मानले, त्याच घरात जीव धोक्यात आला. शेवटी तिने त्या लोकांविरुद्ध पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला.
फिर्यादी 28 वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे लग्न मे 2022 मध्ये सामाजिक रीती रिवाजाप्रमाणे नांदेपेरा येथील पंकज सोबत झाले होते. लग्नाच्या काही दिवसांपर्यंत पतीने तिला चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर घरगुती कामावरून व चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरु झाला. तिच्या बँक खात्यात असलेली रक्कम पतीने बळजबरीने काढून घेतली. ती शिक्षित असून नोकरी करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. परंतु तिच्या दोन विवाहित ननदी हिने नोकरी करणाऱ्या बायकांचा बाहेरच्या पुरुषांशी अफेअर असतात, ही पण तसेच करेल. असे तिच्या पतीला भडकावून तिला नोकरी करण्यास मज्जाव केला.
तिची सासुसुद्धा तिला चांगली वागणूक देत नव्हती. एवढंच नव्हे तर राळेगाव व भद्रावती येथे विवाहित तिची दोन्ही नणंद तिच्या संसारात ढवळाढवळ करून पतीला तिला त्रास देण्यास प्रवृत्त करत होती. 23 जानेवारी रोजी तिचा पहिला तीळव्याचा कार्यक्रम असल्याने तिन आई वडील, भाऊ आणि वहिनीला सासरी बोलाविले होते. परंतु त्यावेळी तिच्या पतीने त्यांचे अपमान करुन परत पाठविले. त्यानंतर पिडीत महिला 25 जानेवारी 2023 रोजी आपल्या भाऊ सोबत माहेरी आली व आजपावेतो माहेरी राहत आहे.
सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याबाबत पिडीत महीलेनी 3 मे रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी तिचे पती पंकज, सासू, राळेगाव तालुक्यातील तिची नणंद व नंदई, भद्रावती येथील तिची नणंद व नंदई असे 6 जणांविरुद्ध कलम 498 (A) व 34 भादविनुसार गुन्हा दाखल केलाआहे.