सुशील ओझा, झरी : शेतातील सवारी बंगल्यातून पंजा चोरी केल्या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला 5 दिवसाचा साधा कारावास व 3 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राहुल संजय कुनघाटकर रा. पांढरकवडा, ता. केळापूर असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि. झरी तालुक्यातील खरबडा येथील अब्दुल जब्बार यांचे शेतातील सवारी बंगला आहे. 12 ऑक्टो. 2020 च्या रात्री दरम्यान आरोपी राहुल कुनघाटकर यांनी सवारी बंगल्यातील पेटीतून पंजा चोरी केला. याबाबत बंगल्याचे अध्यक्ष विलास सोप्परवार यांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 380, 34 भादवि अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांनी प्रकरणाचा तपास करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले.
न्यायालयात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी यांचेसह आठ साक्षदारांचे बयाण नोंदविण्यात आले. बयाण ग्राह्य धरुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, झरी जामणी बी.एस.वाढई यांनी आरोपी राहुल कुनघाटकर यास पाच दिवसाचा साधा कारावास व 3 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील पी.डी. कपुर यांनी न्यायालयात बाजू मांडली. तर पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी एएसआय मारोती टोंगे व नापोका संतोष मडावी यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे चोरट्याचा शोध घेण्यास होमगार्ड इरफान शेख यांनी महत्वाची भूमिका बजावली.