सुशील ओझा, मुकुटबन : पिकांचे जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेली झटका मशिनीची बॅटरी अज्ञात चोरट्याने लंपास केली. फिर्यादी विनोद केशव भोंग (54) रा. जामनी यांनी त्यांचे झरी शिवारात असलेले शेतातून एस्पयार कंपनीची बॅटरी चोरी गेल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात नोंदविली.
फिर्यादी विनोद भोंग यांचे झरी शिवारात 10 एकर शेती आहे. झरी परिसरात घनदाट जंगल असून जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी शेताला कुंपण करून त्यात झटका मशीन द्वारे डीसी करंट प्रवाहित होत असतो. फिर्यादी हा 24 सप्टेंबर रोजी शेतात गेला असता झटका मशीनला जोडलेली एस्पायर कंपनीची बॅटरी किंमत 7 हजार दिसून आली नाही.
फिर्यादी यांनी बॅटरी चोरी बाबत गावात चर्चा केली असता मुकुटबन येथील निसार कादर शेख व बिरसाईपेठ येथील गणपत विठ्ठल मोरेवार यांच्या शेतातून सुद्धा झटका मशीनच्या बॅटऱ्या चोरी गेल्याचे कळले. मागील काही दिवसांपासून तालुक्यात भुरट्या चोरट्यांचा उद्रेक सुरु असून शेतातील मोटर, केबल, बॅटऱ्या सुरक्षित राहील याची खात्री नाही.