वणी : शिरपूर पोलीस ठाणेअंतर्गत बेलोरा येथे इलेक्ट्रिक कामे करणाऱ्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 6 वाजता दरम्यान उघडकीस आली. गावाच्या चौकावर असलेल्या हायमास्ट लाईटच्या खाम्ब्यावर दोरीच्या सहाय्यने फास टाकून त्यांनी आत्महत्या केली. स्वप्नील सुधाकर भोंगळे (28) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचा नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक हा बेलोरा गावात आपल्या आईसह राहता होता. गावात खाजगी इलेक्ट्रिकचे कामे करून तो आपला उदरनिर्वाह करीत होता. रविवारी पहाटेच्या दरम्यान त्यांनी आपल्या घराजवळ असलेल्या हायमास्ट लाईटच्या पोलवर चढून गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी 6 वाजता गावातील काही नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी लगेच शिरपूर पोलीस ठाण्यात सूचना दिली.
शिरपूर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला तसेच मृतदेह खाली उतरवून शव विच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मृतक स्वप्नील याला वडील नसून तो आपल्या आईसोबत राहत होता. स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे त्याच्या आईचा एकुलता आधार हरपला आहे.