वणी टाईम्स न्युज : वणी येथील रवीनगर भागात वास्तव्यास एका इसमाचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात एका लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुनील कृष्णराव देरकर (52) असे मृतकाचा नाव आहे.
मृतक हा प्रॉपर्टी ब्रोकर व्यवसाय करीत होता. जमिनीचा एक सौदा आहे असं सांगून सुनील मंगळवारी मूल येथे गेला होता. मात्र आज मूल येथील एका लॉजच्या खोलीमध्ये त्याचा मृतदेह मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केली की त्याच्या सोबत काही घातपात घडला ? याबाबत शंका कुशंका व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच देरकर कुटुंबीय मूल येथे पोहचले. मूल येथे पोलीस कारवाई आणि पोस्टमार्टमनंतर मृतदेह वणी येथे आणणार असल्याची माहिती आहे.