वणी : येथील महात्मा फुले चौक परिसरात राहणाऱ्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार 15 जाने. रोजी दुपारी उघडकीस आली. कुणाल पुरुषोत्तम मोडक (43) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतक कुणाल कलर पेंटिंगचे काम करायचं. सोमवारी सकाळी तो कामासाठी घरातून निघाला होता. मात्र काही वेळाने तो परत घरी आला. कुणाल यांनी त्याच्या पत्नीला मला आराम करायचा आहे तुम्ही दुसऱ्या खोलीत जा, असे म्हटले. त्यामुळे त्याची पत्नी व मुलगी बाजूच्या खोलीत जाऊन बसले.
काही वेळानंतर पत्नीने खोलीत डोकावून पहिले असता कुणाल हा लाकडी फाट्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी कुणाल याला मृत घोषित केले. मृतक कुणाला याच्या मागे आई, पत्नी व एक मुलगी आहे. कुणाल यांनी आत्म्हत्या का केली ? याचा खुलासा अद्याप झाला नाही.