वणी टाईम्स न्युज : शेतातून परत घराकडे येताना वाटेतच वीज अंगावर कोसळल्याने एका शेतकरी महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. सदर घटना मारेगाव तालुक्यातील गोरज गावात शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता दरम्यान घडली. निर्मला किसन आत्राम (37) रा. गोरज असे मृतक महिलेचा नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार शेतात काम करीत असताना अचानक विजेच्या कडाक्यासह पाऊस सुरू झाल्याने निर्मला घरी जाण्यासाठी निघाली. गावापासून काही अंतरावर पोहचली असता अचानक तिच्या अंगावर विज कोसळली. या घटनेत निर्मला हीचा जागीच मृत्यू झाला. घटनेबाबत मारेगाव पोलीस यांना सूचित करण्यात आले आहे. मृतक महिलेच्या मागे पती आणि दोन पुत्र आहे.