वणी टाईम्स न्युज : येथील महाराष्ट्र बँकेच्या मागे एका कार मध्ये बसलेल्या युवकाकडून पोलिसांनी टोकदार तलवार जप्त केली आहे. शनिवार 28 डिसेंबर रोजी रात्री 11.40 वाजता दरम्यान केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तलवार व मारुती 800 कार जप्त करून युवकावर गुन्हा दाखल केला आहे. प्रणय विजय जाधव (27) रा. अण्णाभाऊ साठे चौक, वणी असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागे उभी असलेली सिल्व्हर रंगाची मारुती 800 कार क्रमांक MH31 CN 4812 ची झडती घेतली. पोलिसांना गाडीच्या डिक्की मध्ये 77 से.मी. लांबीची धारदार लोखंडी तलवार आढळली. कार मध्ये बसलेल्या युवकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याचे विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल केला.
सदर कार्यवाही पीएसआय सुदाम आसोरे यांचे नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल विकास धडसे, कॉन्स्टेबल सागर सिडाम, शुभम सोनुले, विकास ब्राह्मणे यांनी केली.