वणी टाईम्स न्युज : विवाहित युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार 5 डिसेंबर रोजी सकाळी मारेगाव येथे उघडकीस आली. मारोती अंबादास आत्राम (32), रा. प्रभाग क्रमांक 2 मारेगाव असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचा नाव आहे. गुरुवारी सकाळी एक युवक यवतमाळ मार्गावर न्यायालयाच्या जुन्या इमारतीचे मागे गेला असता एक इसम लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून पडला.
आत्महत्येच्या घटनेबाबत गावात वार्ता पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. मृतकाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिल्याचे सांगितले जाते. मृतक मारोती यांच्यामागे आईवडील, पत्नी व दोन मुले आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण स्पष्ट झाले नाही.