वणी टाईम्स न्युज : राज्य परिवहनच्या बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने पँटच्या खिशातून मोबाईल लंपास केला. मंगळवार 3 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता दरम्यान वणी बस स्थानकावर घडलेल्या या घटनेबाबत फिर्यादी अयान मोहम्मद शेख (19) रा. वणी यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे.
फिर्यादी हा गडचिरोली जाण्यासाठी वणी – चंद्रपूर बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. बसच्या दारासमोर प्रवाशांची गर्दी होती. गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या पँटच्या खिशात ठेवलेला रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत 10 हजार लंपास केला. बसच्या सीटवर बसल्यानंतर फिर्यादी यांनी फोन लावण्यासाठी खिशात हात टाकला असता मोबाईल चोरी गेल्याचे लक्षात आले.
लग्नसराईचे सिझन असल्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अशातच पर्स, मोबाईल व महिलांचे दागिने लंपास करणारे चोरटे सक्रिय झाले आहे. वणी येथील बस स्थानकावर पोलीस चौकी सुरु करण्याची मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे.