वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळे फंडे आजमावत आहे. इतर उमेदवाराच्या तुलनेत आमचा उमेदवार कसा कामाचा माणूस आहे, हे पटवून देण्यासाठी सोशल मीडिया ते पथनाट्य आणि कॉर्नर मीटिंग आयोजित केले जात आहे. मात्र मनसे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ कामाचा माणूस या पथ नाट्याची सद्या जोरदार चर्चा आहे.
वणी शहरातील काही महाविद्यालयीन तरुण-तरुणी एकत्र येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजीव उंबरकर यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर पथ नाट्याचे आयोजन करून गावोगावी याचे अंक सादर करत आहेत. यामध्ये उंबरकर यांनी आजवर केलेले सामाजिक उपक्रम आणि राजकीय आंदोलन तसेच शेतकऱ्यांसाठी दिवाळी जेल मध्ये काढण्याचे क्षणाची पथनाट्याच्या माध्यमातून आठवण वणीतील विद्यार्थी कलाकार जतिन राऊत, वैभव पुराणकर, नचिकेत गायकवाड, शितल पिंपळशेंडे, स्वरा उइके, हर्षल ईखारे, योगेश तुराणकर व प्रदीप गुप्ता करून देत आहे.