वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा मतदार संघाचा मागील दोन टर्म पासून नेतृत्व करणारे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे आमदारकीची हॅट्रिक मारण्याच्या तयारीत आहे. संपूर्ण मतदार संघात विद्यमान संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे विरोधात मतदारांमध्ये कुठेही नाराजगी दिसून येत नाही. विकासाचे महामेरू परंतु साधे राहणीमान असलेले संजीवरेड्डी बोदकुरवार यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सबका साथ सबका विकास घोष वाक्याला अनुसरून बोदकुरवार यांचे सर्व जाती, धर्म, गरीब, श्रीमंत, पक्ष असा भेदभाव न करता समान न्याय देण्यावर भर राहिला आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात आजपावेतो जेवढं कामे झाले नाही, तेवढं काम मागील 10 वर्षात झाले. हा सत्य विरोधकही नाकारू शकत नाही. वर्ष 2014 ते 2019 पर्यंत पहिल्या कार्यकाळात संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केंद्रीय विकास निधी अंतर्गत 272.85 कोटी रुपयांचे रस्ते बांधकाम पूर्णत्वास नेले. शिवाय खनिज विकास निधी, नाबार्ड, जि. प. बांधकाम विभाग, MMGSY, आमदार निधी, दलित वस्ती विकास निधी व इतर वैशिष्ट्यपूर्ण निधीतून 381.58 कोटींचे विकास कामे मार्गी लावले.
वर्ष 2019 ते 2024 या दुसऱ्या टर्ममध्ये आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विकास कामांचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करून 1079.35 कोटी रुपयांची कामे मतदार संघातील तिन्ही तालुक्यासाठी खेचून आणले. यात सेतू बंधन योजने अंतर्गत वणी यवतमाळ मार्ग व वणी वरोरा मार्गावर दोन रेल्वे उड्डाण पूल (200 कोटी), अर्थ संकल्पीय विकास कामे (250 कोटी), साई मंदिर ते वरोरा रेल्वे क्रॉसिंग पर्यंत सिमेंट काँक्रिट रोड व स्ट्रीट लाईट (25 कोटी), अमृत योजने अंतर्गत शहरात 24 तास पाणी पुरवठा योजना (140 कोटी) असे मोठ्या कामाचा समावेश आहे. वणी शहरात प्रत्येक गल्ली मोहल्यात सिमेंट रोड बांधकाम झाले तर काही ठिकाणी कामे सुरू आहे.
लाडक्या बहिणी देणार भावाला साथ
भाजप उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची विजयाची हॅट्रिक करण्यामागे मतदार संघातील लाडक्या बहिणीचा खारीचा वाटा असणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून मतदार संघातील हजारों महिलांच्या बँक खात्यात 7 हजार 500 रुपये जमा झाले. त्यामुळे रक्षाबंधन, दिवाळी, भाऊबीज सणासाठी महिलांना दुसऱ्यासमोर हात पसरवण्याची गरज भासली नाही. ही योजना यापुढे ही सुरु राहावे याकरिता महिलावर्ग भाजप उमेदवाराला मतदान करणार, अशी चर्चा खेडोपाड्यात ऐकायला मिळत आहे.
जातिपातीचा फॉर्म्युला ठरणार फेल..
लोकसभा निवडणूक प्रमाणे विधानसभा निवडणुकीतही काही उमेदवार जातीचा फॉर्म्युला ठरवून विधानसभेच्या पायऱ्या चढण्याचा स्वप्न बघत आहे. मात्र वणी विधानसभेचा इतिहास बघितला तर येथील मतदार जातीपातीपेक्षा विकास कामांना प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते. अल्पसंख्यक समाजाचे काँग्रेसचे वामनराव कासावार यांनी चार वेळा येथून निवडणूक जिंकली. तर संजीवरेड्डी बोदकुरवार यांची सलग तिसऱ्यांदा आमदारकीकडे वाटचाल आहे.