वणी टाईम्स न्युज : शहरातील प्रगतीनगर भागात एका पडीक खुल्या विहिरीमुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या तसेच लहान मुलांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला आहे. प्रगतीनगर येथे भरत ठाकूर यांच्या घराजवळ रस्त्यालगत मागील अनेक वर्षापासून खुली विहीर आहे. विहीर पडीक असल्याने आजू बाजूच्या घरातील लोकांनी विहिरीत कचरा टाकण्यास सुरूवात केली.
विहिरी पासून काही मीटर अंतरावर बगीच्यात लहान मुलं खेळायला जातात. विहिरीला सुरक्षा भिंत किंवा जाळी नसल्यामुळे एकाद्या दिवशी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषद प्रशासनाने एक तर माती टाकून विहीर बुजून टाकावी. किंवा त्यावर जाळी लावण्यात यावी. अशी मागणी परिसरात नागरिकांची आहे.